दुर्दैवी ; 9 वर्षीय बालकाचा कुलरचा करंट लागल्याने मृत्यू ; उन्हाळ्याच्या सुट्यांत आला होता आजोबाच्या घरी

 9 वर्षीय बालकाचा कुलरचा करंट लागल्याने मृत्यू 

उन्हाळ्याच्या सुट्यांत आला होता आजोबाच्या घरी

कुही : उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी आजोबाच्या घरी आलेल्या नातवाचा कुलरचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कुही तालुक्यातील फेगड येथे घटलेली आहे.

तालुक्यातील फेगड येथे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आजोबाच्या गावी आलेल्या 9 वर्षीय बालकाचा कुलरचा विद्यूत करंट लागून मृत्यू झाल्याची घटना 12 मे सोमवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे. उत्कर्ष राजू सेलोटे (वय 9 वर्ष) रा. आंभोरा ,ता.कुही असे मृतक बालकाचे नाव आहे. मृतक हा 10 दिवसापूर्वी सुट्यांनिमित्य आजोबा शंकर राऊत फेगड यांच्या गावी फेगड येथे आला होता. आज दुपारी 2 वाजताच्या दरम्यान मृतक उत्कर्ष यास कुलरचा करंट लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतुर येथे आणले असता डॉक्टर नि मृत घोषित केले. त्यावरून वेलतुर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी कुही येथे पाठविला असून वेलतुर पोलीसात मर्ग दखल केला असून तपास ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनात मदन आसटकर करीत आहेत.