दहावीचा निकाल उद्या : दुपारी 1 वाजता होणार ऑनलाइन जाहीर

दहावीचा निकाल उद्या : दुपारी 1 वाजता होणार ऑनलाइन जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल उद्या म्हणजे 13 मे 2025 रोजी, दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. एमएसबीएसएचएसई दहावीचा निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आली. मंगळवारी दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतील. महाराष्ट्र बोर्डाचे निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या लिंकवर तपासू शकता. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख यासारखी माहिती भरावी लागेल.

महाराष्ट्र बोर्डाचा १० वी निकाल २०२५ कसा तपासायचा

– सर्वप्रथम वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर जा.

– त्याच्या होमपेजवरील महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.

– यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

-तुमची गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल, जी तुम्ही डाउनलोड करू शकता.

-स्क्रीनवर दिसणाऱ्या मार्कशीटची प्रिंटआउट घ्या.