पत्रकार,शिक्षक भालचंद्र गांगलवार यांचा आठवा स्मृतिदिन
कुही : ग्रामविकास विद्यालय कुहीचे जेष्ठ शिक्षक,नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस तथा दै. लोकमतचे कुही तालुका प्रतिनिधी भालचंद्र गांगलवार यांचा आठवा स्मृतिदिन ग्रामविकास विद्यालयात उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक तथा पत्रकार प्रदीप घुमडवार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक देवेंद्र बालमवार,पत्रकार सुनील गांगलवार मंचावर उपस्थित होते.
स्मृतिदिन प्रसंगी भालचंद्र गांगलवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.यावेळी विद्यालयात दरवर्षी इयत्ता १० वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस सरांच्या स्मृतिदिनानिमित्य बक्षीस देऊन गौरविण्यात येत असते.यावर्षी हा बहुमान तन्मय भोयर याने मिळविला.म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी गांगलवार सरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.सरांचा प्रामाणिकपणा,चिकाटी, जिद्द,सचोटी व सात्विकपणा या गुणांनी परिपूर्ण असलेल्या सरांना आमच्यातून अल्पावधीत भगवंतांनी आपल्याकडे घेऊन गेले.त्यांच्या कर्तृत्वाचे धडे आजही आमच्या स्मरणात राहील अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रा.सुरेश कुकडे, गौरव शेबे,मंजुषा पडोळे, शालीक भेंडारकर,प्रविण पालांदुरकर,आदी शिक्षक उपस्थित होते.संचालन प्रा.वैशाली देशमुख यांनी तर आभार प्रा सारिका डहाके यांनी मानले.यशस्वितेसाठी प्रमोद धुर्वे,अनिल फेंडर व राकेश रोहाड यांनी सहकार्य केले.



