कुहीत सट्टापट्टी लिहिणारा पोलिसांच्या जाळ्यात
कुही :- शहरातील खरेदी-विक्री गोडाऊन नजीक सट्टा पट्टी लिहिणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली त्याच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अनिल पांडुरंग सहारे ( वय 55) रा. वार्ड क्र.13, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असुन कुही शहरातील खरेदी-विक्री स्वस्त धान्य दुकान नजीक असलेल्या धान्य गोडाऊन जवळ बसून तो सट्टापट्टी लिहीत होता. प्राप्त माहितीनुसार आरोपी अनिल हा लोकां लोकांकडून पैसे घेऊन सट्टापट्टी प्रकारात हारजीतीचा खेळ खेळत असल्याची माहिती कुही पोलिसांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारावर कुही पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंग झडती घेण्यात आली. यात अनिल जवळ सट्टापट्टी व इतर साहित्य आढळून आले. त्याच्या ताब्यातून १६६५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कुही पोलिसांनी आरोपी अनिल सहारे याचे विरोधात कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात कुही पोलिसांच्या पथकाने पार पाडली पुढील तपास सुरू आहे.



