देह व्यवसायात अडकलेल्या 2 महिलांची सुटका
आरोपी महिला अटकेत
वणी: शहरातील प्रेम नगर झोपडपट्टीत वेश्या व्यवसाय चालवल्या बद्दल पोलिसांनी एका महिलेला अटक करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या मध्य प्रदेश आणि जळगाव येथील २ महिलांना पोलिसांनी महिलेच्या तावडीतून सोडवले आहे आणि त्यांना नागपूर येथील पुनर्वसन केंद्रात पाठवले आहे.

नागपूरच्या ‘फ्रिडम फर्म’ सामाजिक संस्थेने वणी पोलिसांना माहिती दिली की प्रेम नगर झोपडपट्टी परिसरात एक महिला देहविक्री व्यवसाय चालवत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि महिलेकडे बनावट ग्राहक पाठवला. संकेत मिळताच, पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकला. जिथे २२ आणि ३२ वर्षांच्या दोन महिलांना देहविक्री व्यवसायात करण्यास भाग पाडताना आरोपी महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात आरोपी महिलेविरुध्ह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.


