सोने-चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक ;  वेलतूर पोलिसांची कारवाई कुही:

सोने-चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक ;

 वेलतूर पोलिसांची कारवाई

कुही:– तालुक्यातील पोलीस स्टेशन वेलतुर हद्दीत येणाऱ्या  मौजा- डोंगरमौदा येथे घरात कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत 61 हजार रुपयांचा माल लंपास केला होता.

 

फिर्यादी अलका संजय रघूते (36) रा. डोंगरमौदा या पतीसह बहिणीच्या गावी मकरधोकडा येथे गेले असल्याने घरी कुणीच नसल्याचे पाहून  (दि.09) ला अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील लॉकर मधील दागिन्यांच्या डब्यातून सोने-चांदीचे दागिने एकूण 61 हजारांचा  मुद्देमाल लंपास केला होता. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून वेलतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गावात विचारपूस केली असता गावातीलच दोन संशयित मुकेश सूर्यभान मेश्राम (33) व निलेश मधुकर राघूते(32) यांना  ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता दोघांनीही चोरी केल्याचे कबुल  केले. आरोपींकडून फिर्यादी यांचे घरून चोरी केलेले गरसुली, डोरले, गोप,लॉकेट , अंगठी, नथ,सोन्याचे मनी व जोडवे आदी सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. रवींद्र फरकाडे करत आहेत.