पोटच्या मुलानेच केला वडिलांचा खून
कुही पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
कुही:- कुही पोलीस स्टेशन हद्दीतील धामणा केशवनगरी येथे वडिलांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून मुलाने वडिलांना काठीने व हातबुक्क्याने मारहाण करत ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

तुळशीराम माणिकलाल बिसेन असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतक तुळशीराम यांना दारूचे व्यसन होते. आरोपी मुलगा नामे जितेंद्र तुळशीराम बिसेन (वय-22) रा.धामणा केशवनगरी हा वडिलांच्या दारू व्यसनाला कंटाळला होता. त्यामुळे रविवारी दुपारी 4.30 च्या सुमारास वडील दारू पिऊन घरी आल्याने बापलेक दोघांतही वाद झाला. अन त्याच रागाच्या भरात मुलगा जितेंद्र याने वडिलांना डोक्यावर काठीने व हातबुक्क्याने मारहाण केली. व यातच त्याचा मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले व पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता नागपूर येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस करत आहे.
या आधीही आरोपी मुलाच्या नावे नागपूर शहर हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती विश्वसनीय माहिती आहे.



