Home अपघात कुही : ट्रकची दुचाकीला धडक ; चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुही : ट्रकची दुचाकीला धडक ; चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुही : ट्रकची दुचाकीला धडक ; चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुही (प्रतिनिधी) : कुही शहरातील कुही – नागपूर मार्गावरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ गुरुवार (दि. 12 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण धडक झाला. या अपघातात दुचाकी चालक सुधाकर रंगराव बावनकुळे (वय 44, रा. कुही) हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कुही येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे सुमारे 4 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कुही पोलिसांनी चालक व ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास कुही पोलीस करीत आहे.

Don`t copy text!