मोहफुलाच्या अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड ; कुही व वेलतुर पोलिसांची संयुक्त कारवाई

मोहफुलाच्या अवैध गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

कुही व वेलतुर पोलिसांची संयुक्त कारवाई

कुही:- पोलीस स्टेशन कुही हद्दीत येणाऱ्या चांपा व वदड येथे अवैध रित्या सुरू असलेल्या मोहफुलाच्या गावठी दारू हातभट्टीवर उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड यांच्या नेतृत्वात कुही व वेलतुर पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करत 2 लाख 23 हजार 930 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड श्रीमती वृष्टी जैन यांनी उमरेड उपविभागाअंतर्गत अवैध दारू वर कारवाई करण्यासाठी कुही व वेलतुर पोलिसांचे संयुक्त पथक गठीत केले. बुधवारी (दि.12) ला कुही पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा- चांपा व वडद येथे धाड टाकली असता तेथे आरोपी ज्ञानेश्वर उर्फ नानु लालचंद पवार (वय 34) रा.चांपा व इतर 5 महिला आरोपी यांच्या ताब्यातून एकूण 33 प्लास्टिक ड्रम मधील 5970 लिटर मोहफुल रसायन सडवा किंमत 2,08,950 रुपये , मोहफुल गावठी दारू 15 लिटर 750 रुपये, 14 ट्युबर कंपनीच्या बियर बॉटल किंमत 2730 रुपये असा एकूण 2,12,430 रुपये तसेच प्लास्टिक ड्रम किंमत 11500 रुपये असा एकूण 2,23,930 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड श्रीमती वृष्टी जैन यांच्या नेतृत्वात कुही व वेलतुर पोलिसांच्या पथकाने केली आहे.