नवऱ्याने अल्पवयीन प्रेयसीसोबत काढलेले अश्लील फोटो बायकोने केले व्हायरल

नवऱ्याने अल्पवयीन प्रेयसीसोबत काढलेले अश्लील फोटो बायकोने केले व्हायरल

नागपूर : पत्नी व दोन मुलांसह भाड्याने राहणाऱ्या युवकाचे घरमालकाच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत सूत जुळले. मुलीच्या अजानतेपणाचा गैरफायदा घेऊन त्या युवकाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यान, युवकाने त्या मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनू सहारे हा खासगी वाहनांवर चालक आहे. त्याला पत्नी व दोन मुले आहेत. घरमालकाची १२ वर्षांची मुलगी प्राजक्ता (बदललेले नाव) नेहमी दिनूच्या घरी खेळायला येत होती. तेव्हापासूनच दिनूची तिच्यावर वाईट नजर होती. तो तिला नेहमी चॉकलेट घेऊन देत होता, तसेच शाळेतही सोडून देत होता. त्यामुळे प्राजक्तासुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाली. दिनू हा प्राजक्ताला नेहमी ओयो हॉटेलमध्ये नेत होता. यादरम्यान दिनूने प्राजक्ताचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. दिनू आंघोळीला गेला असता त्याचा मोबाईल बायकोने बघितला. त्यात नवऱ्यासोबत प्राजक्ताचे शारीरिक संबंधाचे फोटो व व्हिडिओ दिसले. तिने ते सर्व फोटो आणि व्हिडिओ प्राजक्ताच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवले आणि कुटुंबियांनासुद्धा पाठवले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

वडिलांनी विचारणा केली असता तिने प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. मात्र, प्राजक्ता अल्पवयीन असल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रियकर दिनूला अटक केली.