अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान आज कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्या २४१ प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान आज कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्या २४१ प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे. विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं, ज्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच पायलटने “Mayday” कॉल दिला. कॉलमध्ये “नो थ्रस्ट, पॉवर लॉस, अनएबल टू लिफ्ट” असे सांगण्यात आले. काही क्षणांतच विमान वर न जाता थेट हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले. विमान कोसळण्याची वेळ दुपारी जेवणाची (Lunch Time) होती. हॉस्टेलच्या मेस मध्ये बरेच विद्यार्थी आणि डॉक्टर उपस्थित होते. त्यामुळे अपघातावेळी इमारतीच्या मलब्यात दबून २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे बी.जे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी किंवा डॉक्टर होते.

एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये एकूण २४४ प्रवासी व क्रू सदस्य होते. त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ विश्वास कुमार रमेश (ब्रिटिश नागरिक) हा एकमेव प्रवासी सीट 11A वरून जिवंत बाहेर काढण्यात आला. एबीपी अस्मिता चे संपादक रौनक पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवढेही मृतदेह आले आहेत ते इतके जळालेले, की ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. सर्व मृतदेहांची एकत्रित संख्या २६५ झाली आहे.”
या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन दृश्ये, आणि सोशल मीडियावर आलेले फोटो बघून देशभरातून नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघाताचे थरारक व्हिडिओज आणि मेसच्या जळालेल्या भागाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. एअर इंडियाने या दुर्घटनेवर गंभीर दुःख व्यक्त केले आहे. कंपनीने पीडितांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही शोक व्यक्त केला आहे. NTSB (अमेरिका), AAIB (यूके) व DGCA (भारत) संयुक्तपणे अपघाताचा तपास करणार आहेत.

