‘लाडकी बहीण योजना’ : बनावट लाभार्थ्यांची होणार डिजिटल तपासणी ; सरकारचा कठोर कारवाईचा इशारा

‘लाडकी बहीण योजना’ : बनावट लाभार्थ्यांची होणार डिजिटल तपासणी ; सरकारचा कठोर कारवाईचा इशारा

राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्या योजनेच्या मदतीने राज्यात महायुतीला प्रचंड मोठे बहुमत प्राप्त झाले. लाडकी बहीण योजेनच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेबाबत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

गरजू, कष्ट करणाऱ्या महिलांचे संबलीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मात्र या योजनेत काही बनावट लाभार्थी असल्याचे आढळून आले. मात्र आता सरकारने आयकर विभागाकडून डिजिटल तपासणी करून खोटे अर्ज दाखल करणाऱ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार खऱ्या आणि पात्र महिलांना लाभ देणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा आणि त्यांच्या पतीचा आयकर डेटा तपासला जाणार आहे. ज्यांनी चुकीची माहिती दिली, त्यांच्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. त्यामुळे खरोखरच पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेत फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकार डिजिटल तपासणी करणार आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा उद्देश अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. व सरकारच्या निधीचा गैरवापर टाळून खऱ्या व पात्र महिलांना लाभ होणार आहे.