आजाराला कंटाळून इसमाची गळफास लाऊन आत्महत्या

आजाराला कंटाळून इसमाची गळफास लाऊन आत्महत्या

कुही :- दारूच्या व्यसनाला आहारी गेलेल्या इसमाला टीबीची लागण झाली. परिणामी आजारपणाला कंटाळून त्याने टोकाचे पाउल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.

प्रविण सोमाजी थोटे (वय-४०) रा. वार्ड क्र.७ , सुभाष चौक, कुही असे गळफास लाऊन आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. प्रवीण हा दारू पिण्याच्या व्यसनाचा होता. काही दिवसांपासून त्याची प्रकृती खराब होती त्यामुळे घरच्यांनी त्याला नागपूर येथे मेयो रुग्नालयात तपासणीसाठी नेले होते. त्यात गत आठवड्यात त्याला अशक्तपणा जाणवत असल्याने त्याला शहरातील ग्रामीण रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला 3 दिवस भरती ठेवण्यात आले होते. तेथेच त्याला टीबी ची लागण झाल्याचे कळले होते. त्यामुळे तो तणावात होता.

बुधवारी सकाळी त्याचा भाऊ त्याच्या खोलीकडे गेला असता त्याला प्रवीण तो राहत असलेल्या टीनाच्या शेडमध्ये कापडी दुपट्ट्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. लागलीच याची माहिती कुही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवीला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस करत आहे.