Maharashtra Rain Alert: ‘या’ जिल्ह्यात पावसाचा हायअलर्ट
महाराष्ट्रात पुढील ५ दिवस तुफान बरसणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार आहे.
Rain News: राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवस आधी जोरदार सुरु असलेला पाऊस एकदम कमी झाला होता. आता मात्र पुढील काही दिवस राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. हवामान विभागाने त्याबाबत अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार आहे. १३ तर १८ ऑगस्ट दरम्यान कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. आयएमडीने विदर्भात चंद्रपूर, वर्धा, नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर आणि कोल्हापुरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. काल पुणे शहरात पावसाची संततधार सुरु आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर अर्सला असला तरी काही ठिकाणी पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.
कोकण प्रदेशात संततधार सुरु आहे. पुणे जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक धरण बहुतांशी भरत आली आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली असल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरु आहे. शिवसागर जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटले जाते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात देखील पाऊस सुरु आहे.


