पाच दिवसांत चार जनावरांचा पाडला फडशा
कुही तालुक्यात वाघाची दहशत
कुही :- तालुक्यात सर्वत्र वाघाची दहशत असून चिकना -धामना शिवारात वाघाने पाच दिवसांत चार जनावरांचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवार दि.६ सप्टेंबर रोजी धामना येथील संतोष मांढरे आपली गुरे उमरेड – कऱ्हाडला अभयारण्यालगत धामना शिवारात चरायला नेली असतांना गुरे चरताना वाघाने गाईच्या एका गोऱ्यावर झडप घालुन त्याचा फडशा पाडला तर त्याच दिवशी बंडु मांढरे व अनिल कारसरते हे दोघेजण बुटी तलावाजवळ बकऱ्यांचे कळप चारत असतांना दोन्ही कळपातुन प्रत्येकी एक एक शेळी वाघाने फस्त केली.तर रविवार दि.८ रोजी डोंगरमौदा येथील मुकुंदा रामचंद्र कावळे यांनी डोंगरमौदा -धामना शिवारात असलेल्या स्वतःच्या मालकीच्या पडीक जमिनीवर बकऱ्या चारण्यासाठी बांधलेली होती मात्र ती सायंकाळी दिसलीच नसल्याने धावाधाव केली असता बांधलेल्या जागेपासुन एक फर्लांग अंतरावर अर्धी खाल्लेल्या अवस्थेत आढळुन आली तर त्याच दिवशी केवळ ज्ञानेश्वर सोनटक्के रा.डोंगरमौदा या शेतकऱ्यांने आपल्याच शेतात चरण्यासाठी गाईचा दोन वर्षांचा गो-हा बांधला होता परंतु तो सायंकाळी दिसत नसल्याने धावाधाव केली व इकडे तिकडे शोधले असता दुस-या दिवशी अर्धा खाल्लेल्या अवस्थेत आढळुन आला त्यामुळे चिकना.धामना.डोंगरमौदा परीसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंगरमौदा,चिकना,धामना,ठाणा व वेळगाव ही गांवे अभयारण्य लगत असल्याने बरीचशी शेतजमीन अभयारण्यात गेली व उर्वरित शेतजमिनीत शेती करायची म्हटली तर वन्यप्राण्यांच्या धुमकुळामुळे शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे.त्यामुळे या परीसरातील नागरिकांच्या हाताला काम नसल्याने येथील गरीब,गरजवंत नागरिक स्वतःच्या व कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी पाळीव प्राणी पाळतात मात्र येथे लागुनच अभयारण्य असल्याने नेहमीच वाघाचा व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकुळ आहे.यामुळे नागरिक हैराण झाले आहे. वन्यप्राण्याने पाळीव प्राण्याची शिकार केल्यानंतर केल्यानंतर शासनाकडुन तुटपुंजी मदत केली जाते मात्र त्यासाठी असंख्य कागदपत्राची जुळवाजुळव करावी लागते.त्यानंतर चार – सहा महिन्यानंतर मदत मिळते तीही तुटपुंजी असते.त्यामुळे ‘भीक नको,पण कुत्रा आवर’,असे म्हणण्याची पाळी येथील नागरीकांवर आली आहे.तेव्हा शासनाने आपले जनावरे सांभाळुन भयमुक्त जीवन जगु द्यावे अशी मागणी होत आहे.या परीसरात शेती करण्याशिवाय दुसरा उद्योग नसल्याने येथील नागरीकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे मात्र वाघाच्या भीतीने शेतात जाणे कठीण झाल्याने जीवन जगावे कसे?असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा शासनाने या गंभीर बाबीची दखल घेवुन वाघाचा बंदोबस्त करावा नाहीतर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी प.स.सदस्य देवा गवळी सह परीसरातील नागरीकांनी केली आहे.
प्रतिक्रिया :-
वाघाने पाळीव प्राण्यांची शिकार केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या मोबदल्यासाठी वणवण भटकावे लागते व त्यानंतर त्यांच्या पदरी तुटपुंजी मदत मिळते हे आता काही नविन राहीले नाही शासनाने या गंभीर बाबींची दखल घेवुन या परीसराचे पुनर्वसन करावे.अशी मागणी तारणा सर्कलचे पं.स.सदस्य देवा गवळी यांनी केली आहे.