शुल्लक वादावरून कोयत्याने वार ; आरोपी बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल

शुल्लक वादावरून कोयत्याने वार 

आरोपी बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल

 

कुही :- कुही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा सिल्ली येथे  माकडाने  घरावर उडी घेतल्याने टीन खाली पडल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.आरोपीच्या मुलाने देखील तोच कोयता हातात घेत  जखमीच्या मानेवर वार करून त्यांना जीवानिशी  ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमीची फिर्यादी मुलगी हिने दिलेल्या तक्रारीवरून कुही पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुही पोलिसांनी आरोपी दामा लांजेवार याला अटक करण्यात आले आहे.

 

जखमी डोमा जगन लांजेवार (वय 54) व आरोपी दामा जगन लांजेवार (वय 50) दोघेही सिल्ली येथील रहिवासी असून सख्खे भाऊ आहेत.  घराच्या जागेच्या वादावरून दोघांच्या कुटुंबाचे बोलचाल बंद आहे. आरोपी दामा जुन्या घराचे बांधकाम करीत आहे. घटनेच्या दिवशी माकडाने त्यांच्या घरावर उडी घेतल्याने  टीन खाली पडली. यावरून आरोपी दामा यांनी डोमा यांना शिवीगाळ केली भांडण केले व अंगावर धावत जाऊन हातातील कोयत्याने डोमा यांच्या डोक्यावर वार केले. त्याच कोयत्याने आरोपी दामा यांचा मुलगा विराज लांजेवार (वय -19) याने सुद्धा डोमा यांच्या मानेवर वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी डोमा यांची मुलगी फिर्यादी योगिता लांजेवार रा. सिल्ली यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुही  पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बाप-लेकाविरूद्ध  गुन्हा नोंद करून आरोपी दामा लांजेवार याला  अटक करण्यात आली आहे.