अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला.
कुही :– पोलीस स्टेशन हद्दीतील पाचगाव चौकी दरम्यान येणाऱ्या व्ही.आय.टी. कॉलेज परिसरात नाकाबंदी करत अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.१२ मे २०२४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास पाचगाव पोलीस चौकी येथील पोलीस चमू पेट्रोलिंग करीत असताना विश्वसनीय मुखाबिराद्वारे मिळालेल्या खात्रीशीर माहिती मिळाली कि चक्रीघाट कडून टोलनाका मार्गे एक 10 चाकी टिप्परने अवैध रित्या रेती वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच कुही पोलिसांनी व्ही.आय.टी. कॉलेज परिसरात नाकाबंदी केली. रात्री ८.४५ च्या दरम्यान चक्रीघाट कडून एक 10 चक्का टिप्पर क्र.MH४०CT३२८६ येताना दिसला.लागलीच पोलिसांनी ट्रक थांबवत टिप्परची तपासणी केली असता त्यात विनापरवाना रेती आढळून आली. पोलिसांनी आरोपी टिप्पर चालकाला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर रेती हि टिप्पर मालकाच्या सांगण्यावरून पवनी तालुक्यातील खातखेडा घाटावरून विनापरवाना आणल्याचे सांगितले. पोलिसांनी MH४० CT ३२८६ क्रमांकाचा टिप्पर ३०,००,००० रुपये किमतीचा व टिप्पर मधील 6 ब्रास रेती ३५,०००रु असा एकूण ३०,३५,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी टिप्पर चालक आदित्य देविदास कुरुटकर (वय-२१), रा.डोंगरगाव व टिप्पर मालक पवन चकोले, रा.नागपूर यांचेवर गुन्हा दाखल केला आहे.
हि कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊपनि देविदास ठमके,पोह. हरिदास चाचरकर,दिलीप लांजेवार,प्रवीण जावरकर,देवेंद्र बुटले,पंकज सावरे यांच्या पथकाने केली आहे.