पोलीस स्टेशन कुही हद्दीत सट्टापट्टी लिहणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल ; कुही पोलीसांची कामगिरी

पोलीस स्टेशन कुही हद्दीत सट्टापट्टी लिहणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल ; कुही पोलीसांची कामगिरी

कुही :- कुही पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मुकेश बाबूराव बावीसकर, रा. कुही, ता. कुही, जि. नागपुर हा आपल्या आर्थिक फायदयासाठी स्वताच्या घरामध्ये स्वतःच्या मोबाईलवर सट्टापट्टीचे आकडे घेवुन सट्टापट्टी चालवित आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी नमुद घटनास्थळी जावुन धाड टाकली असता मुकेश बाबूराव बावीसकर, वय ४० वर्षे, रा. कुही, ता. कुही, जि. नागपुर हा आपल्या आर्थिक फायदयासाठी स्वतःच्या घरामध्ये मोबाईलवर सट्टापट्टीचे आकडे लिहतांना मिळुन आला.

पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातुन रोख रक्कम ४१० /- रुपये आणि एक ओपो कंपनीचा अॅड्रॉईड मोबाईल किंमत १३,०००/- रुपये असा एकुण १३,४१० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद आरोपीविरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्नील गोपाले यांच्यासह कुही पोलिसांनी केली.