Home क्राईम 80 हजाराच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास ; दिवसाढवळ्या चोरी झाल्याने खळबळ

80 हजाराच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास ; दिवसाढवळ्या चोरी झाल्याने खळबळ

80 हजाराच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

दिवसाढवळ्या चोरी झाल्याने खळबळ

भिवापूर :- भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा- टाका येथे मंगळवारी (13 ऑगस्ट) अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या 80 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनूसार जनाबाई सूर्यभान आंबेडारे (वय ७०) रा.टाका या त्यांचे पती सून नातीन सोबत गावात राहतात. त्यांच्या कडे दोन एकर शेती व म्हशी आहेत. आज त्यांचे पती म्हशी चारायला गेले होते. जनाबाई व सून शेतावर गेल्या होत्या. दुपारी तीन वाजताच्या सुमारास जनाबाईची नातीन शाळेतून घरी आली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले व घरात असलेले सुटकेस व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडून आढळले. त्यानंतर या प्रकाराची माहिती तिने जनाबाईला दिली असता घरी येऊन चौकशी केल्यानंतर घरातील 80 हजार रुपये रोख व दोन ग्रॅम चे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले.चोरीची माहिती पोलिसांना मिळताच भिवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल वृत्त लिहीस्तोवर घटनास्थळी चौकशी करीत होते.

Don`t copy text!