शुल्लक कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार ; अवघ्या दोन तासांत आरोपी अटकेत

शुल्लक कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार 

अवघ्या दोन तासांत आरोपी अटकेत

कुही :-तालुक्यातील  मौजा खलासना येथे आकरावर बसलेल्या तरुणावर महिनाभराआधीच्या शुल्लक भांडण व वादातून दुसर्‍या तरुणाने  धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले आहे. कुही पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली आहे.

थोडक्यात वृत्त असे कि फिर्यादी  तालुक्यातील मौजा खलासना येथील शुभम लंकेश्वर कडू (वय-26) हा रविवारी (दि.१३ ऑक्टो.) सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास आपल्या 6 मित्रांसमवेत नेहमीप्रमाणे गावच्या आकर मैदानावर गप्पागोष्टी करत बसला होता. त्या ठिकाणी आरोपी प्रज्वल प्रकाश गिरी (वय-२१) रा. आजनी हा सुद्धा तेथेच मजाकबाजी करून निघून गेला होता. शुभम व त्याचे मित्र तेथेच बसले होते.  दरम्यान १५ ते २० मिनिटांनी परत आरोपी प्रज्वल हा  तेथे आला व त्याने मागून  शुभमच्या मानेवर चाकू सारख्या दिसणाऱ्या धारदार शस्त्राने  वार केला. वर त्याला खाली पाडून पाठीवर बसून शुभमच्या उजव्या खांद्यावर व डाव्या कमरेजवळ पाठीवर वार करत गंभीर जखमी केले.  जखमी अवस्थेत शुभम जीव वाचवण्याच्या उद्देशाने  तेथून पळून जात थेट  घरी पोहचला व तेथून त्याला नागपूर येथील खासगी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच अवघ्या 2 तासांत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्नील गोपाले, अनिल करडखेळे, राहुल देवीकर करत आहे.

विशेष म्हणजे एक ते दीड महिन्याअगोदर आरोपी प्रज्वल गिरी याने दारूच्या नशेत शुभमच्या आई वडिलांना शिवीगाळ केली होती. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. व काही दिवसांअगोदर  दोघांत हाणामारी सुद्धा झाली होती.