शेतातून सोयाबीन व कापसाचे पोते लंपास
पोलिसांनी 3 चोरट्यांना केले जेरबंद
कुही :- शेतातून 16 कट्टे सोयाबीन व तीन कट्टे कापसाची चोरी करून विकण्यासाठी गेलेल्या तीन चोरट्यांना पोलिसांना कळमना मार्केट यार्ड,नागपूर इथून ताब्यात घेतले आहे.
सचिन राजेंद्र सहारे (वय-२२)रा. खोबना,ता.कुही , कुणाल सुनील शंभरकर (वय २१) रा.नेरी, ता.चिमूर,चंद्रपूर व सौरभ तातोबा सूर्यवंशी(वय २२) रा.चिंचोली,ता.चिमूर,चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी तुषार भास्कर महाले(वय २४) रा. निरवा यांची कुही पोलीस स्टेशन हद्दीतील निरवा शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी 16 कट्टे सोयाबीन व 3 कट्टे कापूस असा ४२५०० रुपयांच्या शेतमालाची चोरी केल्याची तक्रार त्यांनी कुही पोलीस ठाण्यात नोंद केली. तपासा दरम्यान आरोपींनी शेतमाल नागपूर येथील कळमना मार्केट यार्ड येथे विकण्याकरिता घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींना कळमना मार्केट यार्ड नागपूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोयाबीनचे 30000 किमतीचे १६ कट्टे व कापूस विकल्याचे नगदी १११७० रुपये रोख व पिकअप क्र. एमएच ३६ एए ०६७६ किंमत ५ लाख , पल्सर मोटारसायकल क्र. एमएच ४० टीव्ही ६८३२ किंमत ७० हजार असा एकूण ६१११७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे