वडेगाव शिवारात बेपत्ता रेल्वे पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या
७ दिवसांपासून होता बेपत्ता
कुही:- मागील 7 दिवसांपासून जिल्हा रेल्वे पोलीस दलातील शिपाई कर्तव्यावरून निघाल्यावर घरी न परतल्याने घरच्यानी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र चक्क ७ दिवसांनी पोलीस शिपाई कुही पोलीस स्टेशन हद्दितील वडेगाव(काळे) शिवारातील शेतात गळफास लावल्या स्थितीत आढळून आला आहे.

रोषण मनोहर गीऱ्हेपुंजे (वय-३७ ) रा. जुना बाबुलखेडा , अजनी, नागपूर असे पोलीस शिपायाचे नाव असून तो जिल्हा रेल्वे पोलीस नागपूर दलात असून सध्या अजनी रेल्वे मुख्यालय नागपुर येथे कार्यरत आहेत. नामे मृतक रोशन मनोहर गि-हेपुंजे हा दि. 07/12/2024 पासुन घरी कोणालाही काहीही न सांगता दिवसभर ड्युटी करुन सायंकाळी घरी परतलाच नाही.त्याचा मोबाईल सुद्धा बंद दाखवत असल्याने घरच्यांनी त्याबाबत पोलीस स्टेशन अजनी जि.नागपुर (शहर) येथे मिसींग क्र. 200/2024 दि. 07/12/2024 चे 05/30 वा पासुन स्टेशन डायरी साना क्र. 22/2024 वेळ 11/38 वा चे दि. 08/12/2024 प्रमाने दाखल असुन चौकशीत होती. शनिवारी (दि.१४) कुही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा- वडेगाव (काळे) येथील शेतशिवारात स्थानिकांना पल्सर कंपनीची मोटार सायकल क्र. MH-36-AC-4652 ही अज्ञात मोटारसायकल दिसून आली. आसपास पाहणी केली असता एका निंबाच्या झाडाला निळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने एक अज्ञात व्यक्ती गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. लागलीच कुही पोलीसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपासणी केली असता. गळफास लावून घेतलेला मृतक हा बेपत्ता रेल्वे पोलीस शिपाई रोषण मनोहर गीऱ्हेपुंजे असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक पाहणीतून रोषण याने २ ते ३ दिवसांपूर्वी गळफास घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस करत आहेत.



