लग्न समारंभ आटोपून परत जाताना कारचा भीषण अपघात
महिलेचा मृत्यू तर तिघे जखमी
कुही:- साळ्याचे लग्न समारंभ आटोपून पत्नी व मुलासह आपल्या चारचाकीने नागपूर कडे परत जात असताना भरधाव कार अनियंत्रित झाल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात कारचालक पती , मुलगी व एक जन जखमी झाले आहे.

क्रिष्णा जनार्दन शेंडे (वय-32) रा.पिंपळगाव, ता.लाखांदूर, जि. भंडारा हे आपल्या परिवारासह नागपूर येथे आले साळ्याच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते . सोमवारी दि.14 एप्रिल रोजी कुर्जा, ता.ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथे विवाह समारंभ आटोपून उमरेडमार्गे कार क्र. एमएच 46 झेड 6890 ने नागपूरला परत जात असताना कुही पोलीस स्टेशन हद्दीतील कुहीफाटा पुलावर रात्री 12.30 वाजता वाहनचालक क्रिष्णा शेंडे यांचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट डीवायडरवर चढून डीवायडरच्या मधोमध असलेल्या लोखंडी खांबाला धडकली. या भीषण अपघात पोलला धडक देताच कार रोडवर पलटी झाली. यात कारमधील मागच्या सीटवर बसलेली कारचालक यांची पत्नी नीलम क्रिष्णा शेंडे (वय 22) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाल्याने रत्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समोरच्या सीटवरील हेमंत सावतकर (वय-२३) व मुलगी देवांशी शेंडे (वय -3 वर्ष) व कारचालक क्रिष्णा हे सुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून याचा पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि इंगोले करत आहेत.
• कुर्जा येथून लग्नसमारंभ आटोपून रात्री 9 च्या सुमारास चौघेही कार ने नागपूरच्या दिशेने निघाले. त्यात ११ वाजता उमरेड येथे थांबून हॉटेलमध्ये जेवण करत पुन्हा रात्री १२ वाजता नागपूरला निघाले असता १२.३० ला कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात निलिमा यांच्या मृत्यू झाला आहे.


