टेंभरी  शिवारात कापसाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे पकडले

टेंभरी  शिवारात कापसाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे पकडले

कुही :- कापसाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे दुचाकीवर  घेऊन जात असलेल्या इसमावर कृषी विभाग व कुही पोलिसांनी कारवाई करत माल जप्त केला आहे.

 गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गुप्त  माहितीनुसार विक्री व वापरावर बंदी असलेले कापसाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे दुचाकीवर टेंभरी  शिवारात एक इसम घेऊन जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्या अनुषंगाने कृषी अधिकारी, पंचायत समिती कुही व नागपुर कार्यालयातील जिल्हाभरारी पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांना एम एच 40  ई 9699 या दुचाकी वाहणावर अनधिकृत  कापूस बियाणे अजित 155 4G+ कापसाच्या बियाण्यांचे 100 पाकिटे आढळून आली. ते तणनाशक सहनतील म्हणजेच एचटीबीटी बियाणे असल्याचे तसेच या बियाण्यांच्या विक्री व वापरावर राज्य सरकारने बंदी घातली असल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले. विनोद गोपीचंद पाटील रा.नागपूर असे कापसाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे दुचाकीवर  घेऊन जात असलेल्या इसमाचे नाव  आहे. आरोपी कडून मोटार सायकल , प्रतिबंधित बियाणे व इतर साहित्य असा  1 लाख 75 हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई ,चंद्रशेखर कोल्हे  तंत्र अधिकारी गु.नि.विभाग नागपूर,संदीप पवार विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक विभाग नागपूर,राजेश जारोंडे तालुका कृषी अधिकारी कुही, रविंद्र राठोड जिल्हा कृषी अधिकारी नागपूर ,श्री. मार्कंड खंडाईत जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नागपूर जगदीश बेंडे कृषी अधिकारी, पंचायत समिती कुही यांच्या पथकाने केली आहे.