वीज कोसळल्याने तीन मेंढ्या दगावल्या
कुही:- तालुक्यातील हरदोली राजा शेतशिवारात चरत असलेल्या मेंढ्यांवर वीज वीज कोसळल्याने या तीन मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून मेंढी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शनिवारी (दि. 13 जुलै) सायंकाळी 4. 30 च्या सुमारास विजांच्या कडकडाट व पावसाला सुरुवात झाली. त्या दरम्यान हरदोली राजा शेतशिवारात ईश्वर डहारे यांच्या तीन मेंढ्या चरत होत्या. अचानक वीज कोसळल्याने तीनही मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून रूपचंद डहारे यांचे अंदाजे 35 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तेव्हा शासनाने तत्काळ मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.




