मध्यरात्री घरासमोरील दुचाकी पळविली ; कुही पोलिसांत गुन्हा दाखल

मध्यरात्री घरासमोरील दुचाकी पळविली ; कुही पोलिसांत गुन्हा दाखल

कुही:- तालुक्यातील मौजा- मांढळ येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली दुचाकी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी कार्तिक प्रल्हाद खंडाळे (वय-23) रा.वार्ड क्र.6 मांढळ यांनी दि.13 जुलै ला सायंकाळी घरासमोर त्यांच्याकडील 1 चारचाकी व 2 दुचाकी वाहने घरासमोरील त्यांच्याच हार्डवेअर दुकानासमोर पार्क केल्या होत्या. मात्र सकाळी उठून पाहिले असता त्यांच्याकडील होंडा एकटिव्हा क्र.MH40CL 4843 ही दिसून आली नाही. त्यांनी घरी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता मध्यरात्री 3.30 च्या दरम्यान दोन अज्ञात इसमांनी त्याच्या एकटिव्हा गाडीचे हँडल लॉक तोडून वाहन पळविल्याचे दिसून आले. लागलीच खंडाळे यांनी कुही पोलीस ठाणे गाठत अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून याचा अधिक तपास कुही पोलीस करत आहेत.