लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
आरोपी युवक अटकेत
सेलू : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन पीडित मुलीचे लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. अमिषेक अतिष गुप्ता रा. सिंदी (रेल्वे) ता. सेलू जिल्हा वर्धा असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सिंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमीषेक अतिष गुप्ता याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडित मुलीने नकार दिल्याने मोबाईलवर व्हिडीओ बनविला व व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपी अमिषेक अतिष गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी अमिषेक गुप्ता याच्या विरुद्ध कलम ६४(१), ३५६(२), ३५१(२) बि. ऐन. एस. सहकलम ४ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सिंदी पोलीस करीत आहे.


