नागपूरच्या एसबीएल एनर्जी कंपनीत स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू
नागपूर: नागपूरमधील स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या येनवेरा गावाजवळील एसबीएल एनर्जी या कंपनीत स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. इंडस्ट्रियल एक्स्पोझिव्ह तयार करणाऱ्या एसबीएल स्पेशल लिमिटेड कंपनीत हा स्फोट झाला. अमीन एक्सप्लोजिव्ह असे या कंपनीचे आधी नाव होते. आता ही कंपनी एसबीएल कंपनीने विकत घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर- जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नागपूर – काटोल रोडवरील कोतवालबर्डी तालुक्यात एनविरा येथे एसबी 225 एकरात स्पेशल क्लास लिमिटेडची ही फटाके निर्मिती करणारी कंपनी आहे. फटाके निर्मिती करणाऱ्या या कंपनीत फटाक्यांच्या कव्हर मध्ये बारुद भरुन त्याचे फटाके तयार करण्याचे काम सुरू असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला.

या स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलीस तपास करत असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलीसचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नगरपालिकांतून फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवण्यात आल्या
ॲम्बुलन्स देखील घटनास्थळावर तैनात करण्यात आल्या आहेत. या स्फोटामागचे कारण नेमकं काय यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या घटनेत मृत्यू झालेले दोघेही मध्यप्रदेश मधील शिवनी येथील रहिवाशी होते. या घटनेतील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर शहरातील हॅास्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.


