नागपूर: कुख्यात गुंडाने आपसी वादातून चाकूने भोसकून केला मित्राचा खून 

नागपूर: कुख्यात गुंडाने आपसी वादातून चाकूने भोसकून केला मित्राचा खून 

नागपूर : नागपुरात रविवारी पहाटेच्या सुमारास अंबाझरीतील पांढराबोडी भागात हत्याकांडाचा थरार बघायला मिळाला एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्याच मित्राचा चाकूने भोसकून खून केला. हे हत्याकांड उघडकीस येतात शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढराबोडी भागात गॅंगवॉर भडकले. यामध्ये कुख्यात गुंड प्रशांत इंगोले (रा. पांढराबोडी) याने मित्र दीपक गोविंद बसवंत (वय ३४, राहणार पांढराबोडी) याचा चाकूने भोसकून खून केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पांढराबोडीत कुख्यात गुन्हेगार प्रशांत इंगोलेचे वर्चस्व आहे. शनिवारी दीपक बसवंत याच्यासोबत प्रशांत इंगोलेचा वाद झाला होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास प्रशांतच्या टोळीने दीपकचा खून करण्याचा कट रचला आणि चौघांनी आज पहाटेच्या सुमारास दीपकवर हल्ला करून त्याचा खून केला.

खूनाची घटना उघडकीस येताच अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबाझरी पोलिसांना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याची चर्चा सुरू आहे.