कारची विजेचा खांब व दुचाकीस्वारास धडक; अपघातात एक ठार, चार जखमी  

कारची विजेचा खांब व दुचाकीस्वारास धडक; अपघातात एक ठार, चार जखमी  

नागपूर : शहरात विचित्र रस्ते अपघातात एक जण ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. हा अपघात सोमलवाड्यात झाला असून भरधाव कारने विजेच्या खांबावर धडक दिल्यानंतर एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या विचित्र अपघातात कारमधील एक जण ठार तर अन्य चार जण जखमी झाले. अपघात शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडला. ऋषिकेश रमेश नितनवरे (२६, मिलिंदनगर, खामला) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अन्य गंभीर जखमी तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी रात्री अकरा वाजता वर्धा मार्गावरुन एक भरधाव कार जात होती. कारमध्ये ऋषिकेश नितनवरे, कुणाल, सुशांत आणि रोहित सीतापुरे हे बसले होते. सोमवाडा चौकात आल्यानंतर  रोहितचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर धडकली. त्यानंतर कारने समोरुन येणाऱ्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. या विचित्र अपघातात कारमधील चार युवक रोहित, कुणाल, ऋषिकेश, सुशांत आणि दुचाकीस्वार शेखर दीपक शिरभाते (३३, स्नेहनगर) हे चौघेही गंभीर जखमी झाल

सोनेगाव पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ऋषिकेश नितनवरे याचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरु असून एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी जखमी युवक शेखर शिरभाते याचा मित्र चेतन दिग्रसकर (लाडीकर ले आऊट) याच्या तक्रारीवरुन आरोपी कारचालक रोहित सीतापुरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.