घराच्या बांधकामावरील चौकीदाराचा खून ; आरोपी महिलेला अटक
कुही :- नवनिर्मानाधिन बांधकामस्थळी इमारतीच्या चौकीदार म्हणून कार्यरत एका इसमाची येथीलच कामावरील दोघा तरुण मजूरासह महिलेने हातपाय बांधून हत्या केली. ही घटना कुही पोलिस ठाण्यांतर्गत पाचगाव पोलिस चौकी परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. हत्या करून पसार झालेल्या महिलेसह एका विधीसंघर्ष ग्रस्त बालकाला कुही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून विधी संघर्षग्रस्त बालकाची सुधार गृहात रवानगी केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.
सुम्मतलाल मरस्कोल्हे (५५) रा. छपरा, जिल्हा शिवनी, मध्यप्रदेश असे मृतक चौकीदाराचे नाव आहे. तो रेल्वेतील एसएसई विभागातून सेवानिवृत्त झालेले बबनराव सिताराम मगरदे (६३) रा. प्लॉट नं. ४०, कुकडे ले-आऊट, पार्वतीनगर, अजनी यांच्या घराचे बांधकाम उमरेड रोडवरील टॅक ऑफ सिटी परिसरात सुरु असून येथेच मृतक हा चौकीदार म्हणून कामाला होता. फिर्यादी घर मालकाने त्याची येथेच राहण्याची व्यवस्था केली होती. जानेवारी २०२५ पासून घराचे बांधकाम सुरु आहे. फिर्यादी घर मालकाने चार ते पाच दिवसांपासून तिन मजूरांना घर बांधकामाच्या कामाकरीता आणले होते. दरम्यान शनिवारी फिर्यादी घर मालक हे नास्ता करण्याकरिता बाहेर गेले होते. नास्ता करून ते परत येत नाही तर मजूर कामावरुन फरार झाल्याचे लक्षात आले. तर घरात जाऊन बघीतले असता आत चौकीदार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याच्या गळ्याचा दुपट्टा बल्लीला बांधला होता. बाजूला लोखंडी कटोनी पडली होती. लागलीच त्यांनी याची माहिती कुही पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथे पाठवविले. व आरोपींचा शोध घेण्यास कुही पोलीसांचे 2 पथक व 1 स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान आरोपी महिलेला ती भाड्याने राहत असलेल्या मां भवानी नगर, वाठोडा येथून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपी महिलेचे सावित्री घनश्याम बंसकार (वर्मा) वय ३५, रा.लल्लार , पो.मंडला, त.जि. पन्ना (मध्यप्रदेश) ह.मु. मां भवानी नगर, वाठोडा,नागपूर असे असून सोबतच तीचा विधी संघर्षग्रस्त मुलगा याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. तर आणखी एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा आधी तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरिचंद्र इंगोले करीत आहेत. **


