“लाडल्या बहिणींची बँकांमध्ये तुफान गर्दी ”
रक्षाबंधनाच्या पर्वावर बहिणींना राज्य सरकारकडून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत
कुही:- महायुती सरकारच्या व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अति लोकप्रिय ठरत चाललेली “लाडली बहीण योजना” या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थात वार्षिक 18 हजार रुपयांची आर्थिक मदत करणारी योजना सुरू केली आहे. सदर योजना अतिशय लोकप्रिय ठरत असून 31 जुलै पर्यंत “मुख्यमंत्री लाडली बहीण” या पोर्टलवर अथवा विविध शासकीय कार्यालय अंगणवाडी मदतनीस ग्रामसेवक नगरपरिषद सेतू सुविधा केंद्र अशा विविध ठिकाणी सदर योजनेचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लाडला बहिणींना दोन महिन्याची रक्कम एकदाच अर्थात तीन हजार रुपये वळती करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने 31 जुलै पर्यंत पात्र ठरलेल्या लाडल्या बहिणींच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीन हजार रुपयाची रक्कम आल्याचे मेसेज लाडला बहिणींच्या मोबाईलवर प्राप्त होत आहेत. ते पैसे काढण्यासाठी अथवा काही कारणाने पैसे आले नसल्यामुळे आधार कार्ड लिंक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरात सेतू सुविधा केंद्रांसह इत्यादी ठिकाणी व बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी लाडल्या बहिणींची तुफान गर्दी होताना दिसत आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला शहरात दाखल होत असून त्यामुळे आज दि. 16 ऑगस्ट रोजी शहरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सदर योजना शासनाची अतिशय लोकप्रिय ठरत असून गोरगरीब महिलांना या आर्थिक मदतीचा मोठा लाभ होणार आहे. अनेक गोरगरिबांच्या घरी या पैशातून रक्षाबंधनाचा सण अतिशय उत्साहात साजरा होणार आहे. या निर्णयामुळे मात्र महायुती सरकारची विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या संयुक्त निर्णयामुळे या महायुती सरकारची लोकप्रियता विशेष करून महिलांमध्ये वाढल्याचे दिसत आहे. तर याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुण सुशिक्षित बेरोजगारांसाठी लाडला भाऊ ही योजना सुरू केली असून योजनेअंतर्गत ” स्टायपेड ” अर्थात सहा महिने नोकरी या मोबदल्यात सहा हजार रुपये आठ हजार रुपये व 12 हजार रुपये लाडल्या भावांना मिळणार आहेत. सरकारची ही योजना सुशिक्षित बेरोजगार युवकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रशासकीय गोंधळामुळे एकाच दिवशी युवकांकडून ऑनलाईन ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत असल्यामुळे युवकांमध्ये गोंधळ निर्माण होऊन अनेक युवक या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे हे विशेष.