वेळ पडल्यास मी देखील उमेदवारीवर पाणी सोडेल
असं का म्हटले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ?
केंद्रीय निडणूक आयोगाकडून महाराष्ट्राची विधानसभा निवणूक जाहीर करण्यात आली आहे.राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली असून पक्षातील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्तव्य केले आहे. त्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.
नागपूर :- केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल हाती येणार आहे. त्यामुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून पक्षांची देखील जोरदार तयारी सुरु आहे. अद्याप पक्षांचे जागावाटप आणि युतींमधील फॉर्म्युला समोर आलेला नाही. त्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये वेळप्रसंगी उमेदवारीवर पाणी सोडण्यास तयार असल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. तसेच मी या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही उमेदवारी मागणारही नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले बावनकुळे ?
15 वर्षे या मतदारसंघाचा आमदार होतो. पाच वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवणार होतो. मात्र, तेव्हा पक्षाने सांगितले की पक्षाचे काम करा. आताही पक्ष अध्यक्ष म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय करेल, मला माहिती नाही. मात्र, कामठी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी बजावेल. मी या निवडणुकीत स्वतःसाठी उमेदवारी मागितलेली नाही उमेदवारी मागणारही नाही. वेळ पडल्यास पक्षासाठी त्याग करण्याची आपली तयारी असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
काही जागांची अदलाबदल होऊ शकते
पुढे ते म्हणाले, जागावाटपासाठी सीटिंग गेटिंग हे सूत्र जवळपास निश्चित आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल होऊ शकते. (मुख्यत्वे अजितदादा यांच्यासोबत) त्यांचा मागच्या 2019 च्या निवडणूकीमध्ये अनेक ठिकाणी आमच्या विरोधात लढला होता. अनेक मतदारसंघ जिथे दोन्ही पक्ष (भाजप आणि राष्ट्रवादी) तुल्यबळ आहे, तिथे जो पक्ष मजबूत असेल, त्याप्रमाणे काही जागांची अदलाबदल होऊ शकते. सध्या शिंदे गटाकडील आमदारांच्या मतदारसंघाबद्दल आम्ही चर्चा करत नाही. अजितदादांकडे असलेल्या आमदारांच्या मतदारसंघबद्दलही आम्ही चर्चा करत नाही. मात्र, तिन्ही पक्षाचे आमदार असलेल्या मतदारसंघांना वगळून उरलेल्या मतदारसंघावर तिन्ही पक्ष चाचपणी केली जात आहे. जो त्यामध्ये पुढे दिसेल त्या पक्षाला त्या मतदारसंघात उमेदवारी मिळेल, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.