कुही-वडोदा मार्गावर दुचाकीची ट्रकला जबर धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
कुही: कुही-वडोदा मार्गावर कुही पासून हाकेच्या अंतरावर विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने समोरासमोर जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रणय रामकृष्ण कावळे (२४) रा. खोकरला, ता. कुही या युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृतक दुचाकीस्वार वडोदा मार्गे कुहिच्या दिशेने येत असतांना त्याची दुचाकी अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रक क्र. एमएच 40 सीटी 3289 ला जाऊन जबर धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीचा समोरील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृताकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कुही येथे हलविण्यात आले.



