कुही:- तालुक्यातील तितूर शेतशिवारात शेतात चरत असलेल्या गाईवर वीज कोसळल्याने गाय ठार झाली असून गायमालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
*शेतात चरत असलेल्या गाईवर पडली वीज
*शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
सोमवारी तालुक्यात ठिकठिकाणी वीजगर्जनेसह तुरळक पाऊस झाला. यातच तितूर शेतशिवारातील सुधाकर धोंडबाजी खुसपरे यांची तितूर येथील नदी किनाऱ्यावर शेती असून त्यांनी शेतात गाई चरायला नेल्या होत्या. दुपारी 4.20 च्या सुमारास एका गाईवर वीज पडून गाय जागीच ठार झाले आहे. दुधाळू गाईवर वीज कोसळून गाय ठार झाल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले असून त्यात शेतकऱ्याचे अंदाजे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनातर्फे तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी सुधाकर धोंडबा खुसपरे यांनी केली आहे.