कुहीत गुरुशिष्य कार्यशाळा व सांस्कृतिक लोककला महोत्सव थाटात संपन्न ; कलाकारांचा सत्कार

कुहीत गुरुशिष्य कार्यशाळा व सांस्कृतिक लोककला महोत्सव थाटात संपन्न ; कलाकारांचा सत्कार

कुही :- तालुक्यातील मानसी सांस्कृतिक कला मंडळ, मुसळगाव व ऑरेंजसिटी बहुउद्देशीय संस्था, विहीरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुशिष्य कार्यशाळा, स्नेहमिलन व पारंपारिक सांस्कृतिक लोककला महोत्सव बुधवारी कुही शहरात मोठ्या थाटात पार पडला.

शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सौरभदादा दंडारे यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अमित घाडगे, गटविकास अधिकारी डॉ. स्वप्नील मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रदीप घुमडवार, माजी जि.प. सदस्य अरुण हटवार, डॉ. चिंतामण भुजाडे, नाट्य कलावंत सपन राउत, फिल्म अभिनेता किशोर येळणे, गजानन धांडे, हुकूमचंद लांबडे आदी मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांतून आलेल्या कलाकारांनी विविध कला सादर केले. यात कीर्तन, पोवाडे, भारुड, भजन, दंडार सह विविध लोककला सादर करत समाजजागृती केली. कार्यक्रमात गटविकास अधिकारी डॉ. स्वप्नील मेश्राम यांनी शासनातर्फे कलावंतासाठी असलेल्या योजनांची माहिती देत समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांच्याविरोधात समाज जागृती करण्याचे आवाहन केले. तर उद्घाटक सौरभ दंडारे यांनी कलावंतांचा सन्मान करत त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करत त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक शाहीर कालीचरण शेंडे यांनी केले तर आभार पत्रकार निखील खराबे यांनी मानले.या कार्यक्रमात शाहीर पुरुषोत्तम खांडेकर, निनाद बागडे, निशाण सुखदेवे, बादल खांडेकर, भगवान वानखेडे, सुरज नवघरे, गंगाधर शेंडे, महेश शेंडे, बालेश बावणे, अशोक लोणारे, रोमदेव शेबे, दिलीप किरमरे, रामा भिवगडे, साहिल शेंडे, मानसी शेंडे, मंगेश डाहाके, नलु शेंडे, रोशन बावणे आदी कलाकार उपस्थित होते.