आकोली ग्रामपंचायतीत वृक्षारोपण..
एक पेड माँ के नाम उपक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती..
कुही – राज्य शासनाच्या १० कोटी वृक्ष लागवड व एक पेड माँ के नाम या विशेष मोहिमेअंतर्गत, आकोली ग्रामपंचायतीच्या वतीने 15 जुलै मंगळवारी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत समोरील क्रीडांगण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर तसेच अंगणवाडीच्या पटांगणात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.कार्यक्रमात झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष मानवाला जीवनदान देतात अशा घोषवाक्यांसह वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या गीताने वातावरणात पर्यावरणप्रेमाची ऊर्जा निर्माण केली. उपस्थित मान्यवरांनी झाडांचे पर्यावरणीय, आरोग्यविषयक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगताना
झाडे ही पृथ्वीच्या पर्यावरणाचा मूलभूत भाग असून ती कार्बनडायऑक्साईड शोषून प्राणवायू तयार करतात. झाडांमुळे जमिनीची धूप थांबते, पावसाचे प्रमाण संतुलित राहते आणि जैवविविधतेचे संवर्धन होते. झाडांखाली निर्माण होणाऱ्या सावलीमुळे तापमान कमी राहते आणि पक्षी व प्राणी यांना निवारा मिळतो. शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत झाडे ही पर्यावरण संरक्षणाची जिवंत कवच बनतात.
या कार्यक्रमाला जिल्हा पातळीवरील व तालुका पातळीवरील अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास उपायुक्त डॉ. नितीन फुके, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. दिनेश दांडेकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सवाईमूल, प्रशासन अधिकारी श्री. पंजाब चव्हाण, विस्तार अधिकारी श्री. माहुलकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली अंजनकर यांच्यासह, सरपंच सौ. मंदाताई भिभराव पाटील, ग्रामसेवक श्री. श्यामकुमार तितरमारे, ग्रामपंचायत सदस्य श्री. रजक महादेव भोयर, पंचायत समिती श्री. दिगंबर बाल्मीक, अंगणवाडी सुपरवायझर सौ. नारनवरे मॅडम, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.संपूर्ण उपक्रम गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला.

