चिखलाबोडी येथे विज पडून बैलाचा मृत्यू ; शेतक-याचे मोठे आर्थिक नूकसान

चिखलाबोडी येथे विज पडून बैलाचा मृत्यू 

शेतक-याचे मोठे आर्थिक नूकसान

कुही : तालुक्यातील चिखलाबोडी येथे विज पडून दामोदर अतकरी यांच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमी प्रमाणे शेतकरी दामोदर झीबल अतकरी आपल्या शेतात बैल चारण्याकरिता गेले असता  सायंकाळी 5 वाजता च्या सुमारास आभाळ दाटून आले व विजांचा कडकडाट देखील सुरू झाला. अचानक आकाशातून  विज कोसळली आणि त्यांच्या एका बैलाचा जागीच मृत्यु झाला.

या घटनेमुळे शेतक-यांचे अंदाजे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण हंगामाच्या शेती कामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आधिच अस्मानी सुलतानी  संकटात असलेल्या शेतक-यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. घटनेचा पंचनामा करुन शेतक-याला आर्थिक सहाय्य करण्यात यावे अशी मागणी शेतकरी व परिसरातील जनतेने शासनाकडे केली आहे.