कुही पोलीस स्टेशन हद्दीतील सहा जणांवर हद्दपार कारवाई
कुही:- गणेश विसर्जनाचे अनुषंगाने कुही पोलीस स्टेशन हद्दीतील सहा गुन्हेगारांना हद्दपार केले आहे.
दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन कुही हद्दीतील गणेश विसर्जन होत असल्याने सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल. त्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे कुही पोलीस स्टेशनच्या भौगोलिक हद्दीमध्ये गणेशोत्सवा दरम्यान 16 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत कुही पोलीस स्टेशन हद्दीतून एकूण सहा गुन्हेगारांना कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी पाठवलेल्या प्रस्तावावरून हद्दपार केल्या बाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी उमरेड श्री विद्यासागर चव्हाण यांनी पारित केला आहे.
यात तालुक्यातील अवैध देशी व गावठी हातभट्टी दारू विक्रेते असून अनेकदा कारवाई करूनही वर्तनात सुधारणा न झाल्याने पोलीस स्टेशन हद्दीत गणेश उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिनेश मुरलीधर पोहनकर (44), रा.मांढळ, ईश्वर उर्फ बाल्या मधुकर कांडारकर (वय 29) रा. साळवा, तूलाराम तुळशीराम चाचेकर (वय 52), कुही, प्रेमदास मारुती कामठे (वय 57)रा. वग ,जगदीश चिंतामण बारसागडे (49) रा.भोलाहुडकी,मांढळ व आशिष सुरेश पिल्लेवान (वय 35) रा.मांढळ आदींवर हद्दपार ची कारवाई करण्यात आली आहे.




