अनियंत्रित ट्रकची रेलिंगला धडक ; ट्रक उलटून चालकाचा मृत्यू

भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक पलटी 

चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कुही:- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील चांपा डाऊन नजीक नागपूर वरून उमरेड मार्गे जात असलेल्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रित सुटल्याने ट्रक उलटून यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी नागपूर ते उमरेड मार्गे 10 चाकी ट्रक क्र.एमएच 27 बी एक्स 5445 घेऊन जात असताना चांपा डाऊन नजीक ट्रकचालक गुमानसिंग मडावी याचे भरधाव ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या एका बाजूच्या डीव्हाडर ला धडक देऊन लोखंडी रिलिंग तोडत रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेला. दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या नजीक असलेल्या नवीन देसाई निवास शाळेच्या बोर्डाला धडक मारून बाजूच्या नाल्यामध्ये उलटला. यात ट्रकचालक गुमानसिंग मोजेलाल मडावी (वय-46) रा.सिंगपूर, पो.बोरी,ता.बरघाट, जि. शिवणी(म.प्र.) (ह.मु.शितला माता मंदिर जवळ,नागपूर) हा गंभीर जखमी झाला.लागलीच लोकांनी त्याला उचलून नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे पाठविले असता.तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले आहे.

ट्रकमालक फिर्यादी संजय ईश्वरकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हरीचंद्र इंगोले करीत आहेत.