Home Breaking News शिवसेना विधानसभा संघटकावर जीवघेणा हल्ला

शिवसेना विधानसभा संघटकावर जीवघेणा हल्ला

शिवसेना विधानसभा संघटकावर जीवघेणा हल्ला

कुही:– कंत्राटदार तथा उमरेड विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उबाठा) गटाचे विधानसभा संघटक खुशाल लांजेवार यांच्यावर 4 अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. यात लांजेवार हे जखमी झाले आहेत.

कुही तालुक्यातील शिवसेना (उबाठा) नेते तथा विधानसभा संघटक खुशाल लांजेवार यांच्यावर बुधवारी चारचाकीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. फिर्यादी लांजेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेहमीप्रमाणे ते गावात भ्रमण करून 9.30 च्या सुमारास बाजार चौकातून घराकडे जात होते. दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावरील जुनी नगरपंचायत इमारत ते पंचायत समिती दरम्यान झाडे दाट असल्याने काळोखाचा फायदा घेत या ठिकाणी लांजेवार यांच्या दुचाकीसमोर स्कारपीओ गाडी उभी करत तोंडावर रुमाल बांधून चार इसम गाडीतून खाली उतरले. व त्यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्याने लांजेवार यांच्यावर हल्ला चढवत हाता-पायावर दांड्याने फटके मारले. सुदैवाने लांजेवार यांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत तेथून पळ काढला. त्यानंतर अज्ञात हल्लेखोर सुद्धा त्यांच्या वाहनातून नागपूर च्या दिशेने निघून गेल्याचे दिसून आले.पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा हल्ला झाला असून असल्या प्रकारचा हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे हल्लेखोर आलेल्या स्कारपीओ गाडीला नंबर नसल्याने पोलिसांना तपासात मोठी अडचण निर्माण होत आहे.लांजेवार हे कंत्राटदार असून त्यांनी तालुक्यातील अवैध माती/मुरुम उत्खनन करणाऱ्यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना केल्या होत्या.त्यात अवैध उत्खनन करणार्यांवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली असल्याने त्याचाच राग म्हणून त्यातूनच हा हल्ला झाल्याचा आरोप लांजेवार यांनी केला आहे. फिर्यादी लांजेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुही पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भान्यासं 2023 नुसार कलम 126(2), 118(1), 296, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन शहर सुरक्षेसाठी असलेले अनेक सीसीटीव्ही बंद

कुही नगरपंचायत तर्फे शहर सुरक्षेसाठी शहरात ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यासाठी निविदा काढत कॅमेरे बसविण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. त्या अंतर्गत शहरातील मुख्य बस स्थानक, डेपो रोड, टेलीफोन चौक टी-पोईट, मांढळ रोड, शारदा चौक, भारत माता चौक सह इतर काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरात कुठे काय सुरु आहे.याची क्षण क्षणाची माहिती पोलिसांना व्हावी. व कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या संपूर्ण कॅमेरांचे नियंत्रण कुही पोलीस ठाण्यात ठेवले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर सुरक्षेसाठी लावलेले ३५ कॅमेरांपैकी काही कॅमेरे सुरु असून जवळपास अर्धेच कॅमेरे बंद हे कॅमेरे शोभेची वास्तू ठरत आहे. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने बंद पडलेल्या कॅमेरांना पुन्हा सुरु करण्याची मागणी नागरिकांतर्फे केल्या जात आहे.

Don`t copy text!