सातबारा उताऱ्यांचे डाउनलोड तीन दिवस राहणार बंद
पुणे :- भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्यायावत करण्यात येणार आहे. त्यामुळे 19 ते 22 जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. परिणामी तीन दिवसांच्या काळात सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाउनलोड करता येणार नाही, अशी माहिती फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली आहे.
ई – फेरफार, ई- हक्क ,ई – चावडी तसेच ई- महाभूमी या पोर्टलवरून सातबारा उतारे ,8 अ, मिळकत पत्रिका, फेरफार उतारे ऑनलाइन डाउनलोड करता येतात. या पोर्टलचे सॉफ्टवेअर जुने झाल्याने सध्या वेगाची मर्यादा येत आहे .उतारे डाऊनलोड करताना अडचणी येतात .
हे सॉफ्टवेअर 2016 पासून वापरात आहे त्यात आधुनिकता आणणे गरजेचे होते. त्यामुळे भूमी अभिलेखने हे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी विभागाकडून चालविण्यात येणारी सर्व पोर्टल 19 जुलै सायंकाळी सहा वाजेपासून 22 जुलै रात्री १२ पर्यंत बंद राहतील.
(स्त्रोत :- लोकमत अग्रो.)