कुही :- पेट्रोलिंग दरम्यान विश्वसनीय मुखबिराद्वारे मिळालेल्या विश्वसनीय माहिती द्वारे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एकावर कुही पोलिसांनी कारवाई केली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कुही पोलीसांतर्फे पाचगाव चौकी परिसरात पेट्रोलिंग करत असताना विश्वसनीय मुखबिराद्वारे मिळालेल्या विश्वसनीय माहिती द्वारे एक इसम मोटरसायकलने दारू नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच कुही पोलिसांतर्फे कुही फाटा ते उमरेड कडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचासमक्ष जाऊन थांबले असता पाचगाव मार्गे उमरेड कडे जाणारी मोटरसायकल दिसून आली. कुही पोलिसांनी दुचाकीला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीस्वार दुचाकी घेऊन भरधाव वेगाने पळून लागल्याने कुही पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करत गाडी थांबवली व पंचांसमक्ष दुचाकी चालकाचे नाव विचारले असता सुनील जालंधर परतेकी (वय 44) रा. उंदरी असे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष मोटरसायकल क्र. एमएच 40 सीबी 5577 वर मागच्या बाजूला असलेल्या खाकी रंगाच्या थैलीत देशी दारूच्या संत्रा नंबर 1 च्या 90 एमएल च्या 100 निपा आढळून आल्या.प्रत्येकी किंमत 35 रुपये प्रमाणे 3500 रुपये तर दारू वाहतुकीसाठी वापरलेली मोटरसायकल क्र. एमएच 40 सीबी 5577 ची अंदाजे किमत ५०,००० रुपये असा एकूण ५३,५०० रुपयांचा मुद्देमाल कुही पोलिसांनी ताब्यात घेत आरोपीवर कलम ६५ (ई) (अ) मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. सुधीर ज्ञानबोनवार सह रणजीत मेश्राम यांनी केली आहे.