मुंबईच्या समुद्रात मोठी दुर्घटना, १३ प्रवाशांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता

मुंबईच्या समुद्रात मोठी दुर्घटना, १३ प्रवाशांचा मृत्यू

आकडा वाढण्याची शक्यता

मुंबईच्या समुद्रात आज मोठी दुर्घटना घडली. प्रवासी बोटीला स्पीड बोटनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. अपघातानंतर यंत्रणेनं बचावकार्य हाती घेतलं होतं. आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर १३ मृतांमध्ये नौदलाच्या तिघांचाही समावेश आहे. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईच्या गेटवेहून एलिफंटाला जाणाऱ्या पर्यटकांच्या बोटील स्पीड बोटीने धकड दिली. त्यामुळे बोट समुद्रात बुडाली. या बोटीत किती प्रवासी होते याची निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही. आतापर्यंत १०१ जणांना वाचणण्यात आलं असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुधे १३ प्रवासी आणि ३ नेव्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आणखी दोघांडी प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

‘ मुंबईनजीक समुद्रात घडलेल्या दुर्घटनेनंतर पोलिसांपासून कोस्टगार्ड प्रवाशांच्या मदतीला धावले. या बचावकार्यात नौदलाच्या ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरु आहे. मात्र या घटनेची अंतिम आणि संपूर्ण माहिती उद्यापर्यंत देण्यात येईल. शासनाच्या सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर करण्यायत आली आहे. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी शासनाच्या वतीने केली जाणार आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.