डोडमा ते डोंगरगाव रस्त्याची दुर्दशा ; रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा ईशारा.

डोडमा ते डोंगरगाव रस्त्याची दुर्दशा ; रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा ईशारा.

कुही:- डोंगरगाव ते डोडमा या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. परिणामी, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून डोडमा येथील शाळकरी मुले शाळेत ये-जा करतात. तसेच नागरिकसुद्धा दवाखाना, रेशन धान्य घेण्यासाठी डोंगरगाव येथील दुकानात जातात. डोंगरगाव येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या कामांकरिता डोडमा येथे ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्याच्या दैनावस्थेमुळे नागरिकांना त्रास सोसावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी गट ग्रामपंचायतीचे सरपंच वामन घोडमारे, दिनेश साळवे व नागरिकांनी केली आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.