पंतप्रधान आवास योजना माहिती देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची शहरात भ्रमंती ; गरजू लाभार्त्यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन

पंतप्रधान आवास योजना माहिती देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची शहरात भ्रमंती  

गरजू लाभार्त्यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन

 
कुही :- कुही शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन कार्यान्वित करण्यात आला असून कुही नगर पंचायतच्या मुख्याधिकारी दीपिका गायकवाड शहरामध्ये भ्रमण करून या योजनेबाबत नागरिकांना माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करीत आहे.

देशातील गरीब गरजूंना हक्काचे घर मिळावे व त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये शहरामध्ये एकूण२४८ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. आता या योजनेचा दुसरा टप्पा कार्यन्वित करण्यात आला असून या टप्प्यामध्ये अद्याप पर्यंत २६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहे. शहरातील गरीब व गरजूंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कुही शहराच्या मुख्याधिकारी दीपिका गायकवाड आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी शहरात फेरफटका मारून नागरिकांशी संवाद साधून या योजनेबाबत माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करताना दिसून आल्या. यावेळी त्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे नगर पंचायत कार्यालय जमा करण्याचे सांगितले.

योजनेच्या लाभासाठी लाभार्थी तसेच कुटुंबातील इतर सदस्याचे नावे पक्के घर नसावे, लाभार्थ्यांनी गेल्या वीस वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नसावा , कुटुंबाचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल क्रमांक लिंक असलेले, अर्जदार कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, अर्जदार आई-वडील त्यांच्या आधार कार्ड हयात नसल्यास मृत्युपत्र, तहसीलदाराचे चालू वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार लिंक असलेले, जमिनीचे पुरावे, अखीव पत्रिका, सिटी सर्वे उतारा नकाशा , शासकीय जागेचा पट्टा, रजिस्ट्री असेसमेंट, कराची पावती, टॅक्स पावती, एन. ए. टी. पी. प्रमाणपत्र, गुंठेवारी प्रमाणपत्र आदी कागदपत्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

गरजू नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधून प्रधानमंत्री आवास योजना शहरी टप्पा दोन या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान मुख्याधिकारी दीपिका गायकवाड यांनी केले आहे. कुही शहरांमधील नागरिकांना या योजनेबाबत माहिती देण्यासाठी नगरपरिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पथके तयार केली आहेत. या पथकामध्ये कार्यालय अधीक्षक राजू आसोले, प्रशासकीय अधिकारी निहाल माळवी, विनायक चित्ते, नगर अभियंता दत्तात्रय साठे, पाणीपुरवठा अभियंता रूपेश नवलाखे, स्वच्छता निरीक्षक विनोद सांडेकर, लेखापरीक्षक चैत्यन्य गायकवाड, लेखापाल उमेश चटप, बांधकाम अभियंता वैभव साखरकर व इतर कर्मचारी योगेश्वर तलमले, कवडू जुमळे, संग्राम खतवार, युवराज परतीके, ऋषी तलमले व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.