तहसीलदार अरविंद हिंगे यांची कुहीच्या तहसीलदार पदी नियुक्ती
कुही :- कुहीच्या तहसीलदार पदी अरविंद हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अरविंद हिंगे यांनी अगोदर जिल्ह्यातील कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून काम पहिले आहे. कुही तालुक्यात शासनाच्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्रभर गाजल्यानंतर काही दिवसांनी कुहीचे तत्कालीन तहसीलदार शरद कांबळे यांची तहसीलदार (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथील रिक्त पदावर बदली झाल्यानंतर कुही तहसीलचा कार्यभार प्रभारी म्हणून देण्यात आला होता. मात्र हिंगे यांच्या नियुक्तीने कुहीला पूर्णवेळ तहसीलदार मिळाला असून त्यांनी कार्यभार हाती घेतल्यावर कुही तहसील कार्यालयातील लेटलतीफ कारभारामुळे प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील.
विशेष म्हणजे हिंगे यांच्या नियुक्तीने तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन सह अवैध वाहतुकीवर आळा बसणार असल्याचे बोलले जाते.