अंगणवाडी केंद्रात बालकांना दूषीत बुरशी, अळ्या असलेल्या सोनपापडीचे वाटप ; वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला

अंगणवाडी केंद्रात बालकांना दूषीत बुरशी, अळ्या असलेल्या सोनपापडीचे वाटप ; वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला

पवनी : शहरातील बालक, गरोदर स्त्रिया, स्तनदा यांना बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी, भंडारा यांच्या वतीने शहरातील अंगणवाड्यावर नियंत्रण ठेवल्या जाऊन सकस आहार पुरविल्या जातो. अंगणवाडीतून विशेष आहार म्हणून लाडू, चिवडा याचा मेनू असताना शहरातील सर्वच अंगणवाड्यात चिवडा व सोनपापड्याचा वाटप बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आला.

सदर वाटप करण्यात आलेल्या सोनपापळ्या या मुदतबाह्य झाल्या असून त्यांना रुण्या लागलेल्यामुळे चुरा झाल्या. शिवाय त्यात जिवंत अळ्या, व बुरशी लागलेल्या असल्याचे अंगणवाडी सेविकांच्या लक्षात आल्याबरोबर वाटप बंद करून परत त्या जमा करण्यात आल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शासनाच्या निर्देशानुसार दररोज पोषण आहार पुरविला जातो. बालकांना गोडधोड खायला मिळावे या उद्देशाने बालकांना लाडू, चिवळा द्यावा असा मेनू असतानाही पुरवठादारांनी गुदतबाह्य निकृष्ट दर्जाच्या सोनपापड्या ज्या चुरा होऊन त्यात जीवंत अळ्या, व बुरशी लागलेल्या वस्तूंचा वाटप करताना अंगणवाडी सेविकांच्या लक्षात आल्याबरोबर वाटप बंद करण्यात आला. तरीपण काही बालकांनी खाल्ले व काहींनी खिशात घेऊन घरी गेले. ही बाब काही पालकांच्या लक्षात आली. त्यामुळे काही पालक चक्क अंगणवाडीत जाऊन सेविकांच्या नजरेस आणून दिले.

बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सदर प्रकरणाची माहिती मिळताच पवनी येथे बचत गट अंगणवाडी सेविका मदतनिस यांची सभा घेऊन सोनपापडीचे नमुने गोळा केले व आहाराची चव व शहानिशा केल्याशिवाय बालकांना वाटप करू नये अशा सूचना केल्या. सदर नमुन्यांची अन्न औषधी विभागाकडून तपासणी करणार असल्याचे सांगितले. यापुढे पोषण आहारात हयगय झाल्यास कारवाई केल्या जाईल अशा सुचनाही दिल्या.