पचखेडी येथे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न : ग्रामीण खेळाडूंनी दाखविले कला कौशल्य

मनोहर हारगुडे
कुही : पचखेडी केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव मंगळवारी व बुधवारी (दि 16 व 17 ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पचखेडीच्या प्रांगणात पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रबंधक डॉ. प्रवीण डोंगरे यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गट ग्रामपंचायत पचखेडीचे सरपंच विवेक मेश्राम, उपसरपंच दिलीप भोयर, माजी उपसभापती संजय वाघमारे, केंद्रप्रमुख मनोज बोरकर, शा. व्य. समिती उपाध्यक्षा मालूताई इटनकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप शेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष गुणवंता लांजेवार,शा. व्य. समिती माजी अध्यक्ष अंताराम ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता प्रणय मेश्राम उपस्थित होते.

दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात सांघिक मैदानी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, वैयक्तिक स्पर्धा अशा विविध चुरशीच्या स्पर्धा संपन्न झाल्या. ग्रामीण खेळाडूंनी विविध कला कौशल्यांचे प्रदर्शन केले. विजयी चमू व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्वाधिक खेळात विजयी होऊन आदर्श शाळा पचखेडी अग्रेसर राहिली. बक्षीस वितरण शेतकरी कामगार नेते राजानंद कावळे, सरपंच विवेक मेश्राम, मुख्याध्यापिका मिनाक्षी तिजारे, शा.व्य.समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर शेंडे, सामाजिक कार्यकर्ता राधेश्याम लांजेवार, मनोहर हारगुडे, अंताराम ठाकरे, शा. व्य. समिती व ग्रामपंचायत सदस्य, सर्व मुख्याध्यापक यांचे हस्ते करण्यात आले.
या क्रीडा स्पर्धेत पचखेडी केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख मनोज बोरकर, संचालन मुख्याध्यापक गोदरू दहीलकर यांनी केले. तर तुषार कोहपरे यांनी आभार मानले.







