Home कुही कुही शहरात शिवजयंती उत्साहात साजरी ; उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध कलागुण सादर

कुही शहरात शिवजयंती उत्साहात साजरी ; उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध कलागुण सादर

कुही शहरात शिवजयंती उत्साहात साजरी ; उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध कलागुण सादर

कुही : येथील थोटे ट्युशन क्लासेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमातून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देत, विद्यार्थ्यांनी आपल्या अमोघ वाणीतून महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे दिली. तसेच,अंगावर शहारे आणणारे पोवाडे आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर शिवमय करून टाकला.

कार्यक्रमात त्रिशा लांबाडे, मिताली लांबाडे, आरोही ठवकर, काव्या पिकलमुंडे, दृष्टी भाजीपाले, सृष्टी भाजीपाले, साची बांते, लावण्या बांते, श्राव्या ठवकर, पूर्वी ढबाले आणि अक्षरा ढबाले या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध कलागुण सादर केले. ​याप्रसंगी शिक्षिका प्रिया थोटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिवरायांचे शौर्य, पराक्रम आणि ‘स्वराज्य’ स्थापनेचा इतिहास सांगितला. महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य आणि त्यांचे नैतिक विचार आजही तितकेच प्रभावी असून, विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श आपल्या दैनंदिन जीवनात जोपासावा, असे आवाहन शिक्षकांनी केले.​या सोहळ्याला विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता गोड प्रसादाने करण्यात आली.

Don`t copy text!